
विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली. आज ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही 76 वी बैठक होती.
विमानतळा सभोवतालचा परिसर विकसित करून सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट ‘आशा’ असे विकसित भागाचे नाव असेल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 29, 2021
एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या विकसित भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करेल





























































