अंधेरीत बुधवारी पाणी नाही, 1200 मिमीच्या जलवाहिनीची होणार दुरुस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेकडून के/पूर्व अंधेरी विभागात, जोगेश्वरी (पूर्व) येथे महाकाली गुंफा मार्गावर नंदभवन इंडस्ट्रीजजवळ 1200 मिलीमीटर व्यासाच्या वर्सेवा आऊटलेट या जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे काम 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून गुरुवार 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत म्हणजे, बुधवार 6 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजेपासून गुरुवार 7 ऑक्टोबरला सकाळी 10 पर्यंत अंधेरी पूर्व व पश्चिम विभागांमधील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

या भागात पाणीपुरवठा खंडित राहणार

व्ही.पी. मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्टेशन रोड, गिल्बर्ट हिल, महाकाली मार्ग, पेपर बॉक्स, मळपा डोंगरी क्रमांक 3, शेर-ए-पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभणा परिसर, तक्षीला मार्ग, पूनम नगर, गोणी नगर, कांतिलाल कंपाऊंड, पी.एम.जी.पी. का@लनी, बीमा नगर, विशाल हॉल, तेली गल्ली, साईवाडी, एन.एस. फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली, विलेपार्ले (पूर्व) भाग, सहार मार्ग, शहाजी राजे मार्ग, हनुमान मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, श्रद्धानंद मार्ग, दयालदास मार्ग, जुहू कोळीवाडा (मांगेला वाडी), हिराभाऊ गावडे मार्ग आणि जुहू तारा मार्ग, चार बंगला, डी. एन. नगर, मनीष नगर, मोरागाव (जेव्हीपीडी) (गुलमोहर मार्ग, पार्ला पश्चिम), जेव्हीपीडी आणि मोरागाव, रिलायन्स मोगरा, जुना नागरदास मार्ग, नवीन नागरदास मार्ग, मोगरापाडा.