
पुणे शहरातील हडपसर परिसरातील सातवनगरमध्ये असलेल्या नवजीवन मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणपती मित्र मंडळाच्या मंदीरातून चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली. ही घटना 2 ते 3 ऑक्टोबरदरम्यान सातवनगरमध्ये घडली. याप्रकरणी परेश सावंत (वय 30) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सातवनगरमध्ये नवजीवन मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणपती मित्र मंडळाच्या मंदीराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 ते 3 ऑक्टोबर कालावधीत मंदीरातील 3 हजार 500 रूपये किंमतीची दानपेटी आणि त्यातील चार हजारांची देणगी असा साडेसात हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करीत आहेत.






























































