जैवविविधतेचे जतन करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार! महाराष्ट्र जनुक कोष अहवाल उद्धव ठाकरे यांना सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील महत्त्वाची पिके तसेच पशुधनाच्या वाणाचे जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र जनुक दोष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून जैवविविधतेचे जतन करण्यात येणार असून हे काम म्हणजे आपले भवितक्य आणि भविष्यासाठी आहे. वातावरणीय बदलाच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देणाऱया पिकांपासून ते मासे, पशूधन यांचे वाण जतन संवर्धनाचे प्रयत्न करावेच लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

आयोगाच्या वतीने महाराष्ट्र जनुक कोष (जीन बँक) कार्यक्रम प्रकल्पाचा कार्यपूर्ती अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत वर्षा येथील समिती सभागृहात सादर करण्यात आला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या नेहमीच्या जगण्याच्या धावपळीत जैव विविधतेकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत जीन बँकेच्या कार्यक्रमातून अभिमानास्पद काम सुरु आहे. देशातील अशी पहिली संस्था आणि पहिला प्रकल्प आहे, याचे विशेष कौतुक आहे. यातून देशाला दिशा देणारी कामगिरी होत आहे. आयोगाने जीन बँक कार्यक्रमातून कामाचा मजबूत असा पाया तयार केला आहे. त्यामुळे पुढे जाणे कठीण नाही. हा कार्यक्रम सगळ्यांच्या सहभागाने पुढे जाणार आहे. विविध संस्था, विभाग यांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे.
यावेळी नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, महाराष्ट्र जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव पाटील, बायएफचे अध्यक्ष गिरीष सोहनी, व्ही. एन. राव, प्रवीण श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

आपल्यालाही अशा बियाणे, प्रजातींच्या जतन-संवर्धनाचे प्रयत्न करायला हवेत. हे आपण आपल्या भविष्यासाठी, भवितव्यासाठी करतो आहेत.