जनतेला महागाईचे चटके, गॅस 15 रुपयांनी महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल, डिझेल, सीएनजीबरोबरच घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गॅस सिलेंडर 15 रुपयांनी महाग झाला असून, सणासुदीच्या दिवसात जनतेला महागाईचे चटके बसत आहेत.

14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडर 15 रुपयांनी महाग झाला. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडून मिळणारी सबसिडी अचानक बंद झाली आहे. त्यामुळे जनतेला विनासबसिडी किमतीत गॅस खरेदी करावा लागत आहे.

जुलैपासून 90 रुपये दरवाढ

  • 1 जुलैपासून चारवेळा दरवाढ केली. गॅस 90 रुपयांची महागला. 1 जुलैला 25.50 रुपये, 17 ऑगस्टला आणि 1 सप्टेंबरला पुन्हा 25 रुपये आणि आज 15 रुपयांनी दरवाढ केली.
  • देशभरात बहुतांशी ठिकाणी गॅस सिलेंडरच्या किमती 900 रुपयांवर गेल्या आहेत. दिल्ली आणि मुंबईत 899.50 रुपये, कोलकाता 926 तर पुणे 902.50 रुपयांवर गॅस गेला आहे.