टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पंच पॅनलची घोषणा, पंचांमध्ये हिंदुस्थानचे नितीन मेनन तर श्रीनाथ सामनाधिकारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी गुरुवारी पंचांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली. या प्रतिष्ठsच्या स्पर्धेसाठी आयसीसीने 16 मुख्य पंच आणि 4 अनुभवी सामनाधिकारी यांची निवड केली आहे. यामध्ये नितीन मेनन हे हिंदुस्थानचे एकमेव पंच असून जवागल श्रीनाथ हे सामनाधिकारी आहेत.

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान यूएई आणि ओमान येथे टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. 45 सामन्यांच्या या स्पर्धेत 16 मैदानी पंच आणि चार सामनाधिकारी निश्चित करण्यात आले आहेत. सहाव्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने अलीम दार, मराइस इरास्मस आणि रॉड टकर यांची निवड केली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीची लढत ओमानमध्ये न्यू जोसेंडर आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. या लढतीसाठी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि ख्रिस गॅफनी हे पंच असतील.

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पंच ः

खिस ब्राऊन, अलीम दार, कुमार धर्मसेना, मराइस इरास्मस, ख्रिस गॅफनी, मायकल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, नितीन मेनन, अहसन रजा, पॉल रायफल, लॅग्टन रुसेरे, रॉड टकर, जोएल विल्सन, पॉल विल्सन.

हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीसाठी इरास्मस-गॅफनी पंच

या स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज लढत 24 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थान आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार आहे. अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेले असणाऱया या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे मराइस इरास्मस आणि न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी यांच्यावर पंच म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याचबरोबर डेव्हिड बून हे या लढतीसाठी सामनाधिकारी असतील.

सामनाधिकारी ः डेव्हिड बून, जेफ क्रो, रंजन मदुगले, जवागल श्रीनाथ.