
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या राम रहिमला पंचकुला विशेष सीबीआय न्यायालयाने समर्थकाच्या हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. येत्या 12 ऑक्टोबरला दोषी राम रहिम आणि अन्य दोषींना काय शिक्षा द्यायची याचा निर्णय होणार आहे.
रणजीत सिंगच्या हत्येसाठी राम रहिम आणि इतर पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. रणजीत सिंगची 2002 मध्ये हत्या करण्यात आली होती. मृत रणजीत सिंग हा डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहिमचा समर्थक होता आणि 10 जुलै 2002 रोजी त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने 3 डिसेंबर 2003 रोजी रणजीत सिंग हत्या प्रकरणात एफआयआर नोंदवला होता.


























































