
रोमॅण्टिक, कॉमेडी तसेच सामाजिक विषयांवरील चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता आयुष्मान खुराना आता अॅक्शन हीरो बनणार आहे. ‘अॅक्शन हीरो’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.
शनिवारी चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच करण्यात आले. टी-सीरिज आणि कलर यलो प्रॉडक्शन या बॅनरखाली भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि आनंद एल. राय यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर दिग्दर्शनाची धुरा अनिरुद्ध अय्यर सांभाळणार आहेत. यानिमित्ताने अॅक्शन जॉनरमध्ये आयुष्मान पहिल्यांदा नशीब आजमावणार आहे.
आयुष्मान म्हणाला, ‘‘मी यानिमित्ताने तिसऱयांना आनंद एल. राय यांच्यासोबत काम करतोय. अॅक्शन हीरोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आमची टीम सज्ज आहे. शूटिंगसाठी मी खूप उत्साहित आहे.’’ हिंदुस्थान आणि यूकेमध्ये चित्रपटाचे शूटिंग होणार आहे.





























































