खोटे बोलणाऱयांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून हाकलले! गेट आऊट केले!! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सणसणीत चपराक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– सिंधुदुर्गात आता जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते फक्त माझ्यामुळे, नारायण राणेंमुळे. त्याच्या जवळपास पण कोणी नाही.

– आदित्य ठाकरे टॅक्स फ्री आहेत. त्यांनी टाटाचा पर्यटनाचा रिपोर्ट वाचावा आणि सर्वांना अभिप्रेत असलेले काम करावे. आनंद वाटेल.

– बाळासाहेब ठाकरे यांना खोटे अजिबात आवडायचे नाही. खोटे बोलणाऱयांना त्यांच्यासमोर थारा नव्हता.

– एमआयडीसीतील 80 टक्के उद्योग माझ्याअंतर्गत आहेत. समुद्रकिनारी कोणते उद्योग येतात ते मी आणणार.

– तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात, कुठे जातात याची एकदा गुप्तपणे माहिती घ्या.

– माझा समज असा आहे की, सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाही तर कोणीतरी बोलेल, की मीच बांधला.

– पाठांतर करून बोलणे वेगळे आणि आत्मसात करून तळमळीने बोलणे वेगळे आणि मळमळीने बोलणे आणखी वेगळे असते.

-खोटे बोलणाऱयांना बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतून काढून टाकले. अगदी गेट आऊट केले हासुद्धा इतिहास आहे.

-लघु का असेना, सूक्ष्म का असेना, पण मोठे खाते तुमच्याकडे आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या भल्यासाठी होईल याकडे पहावे.

-विनायक राऊत हे जनतेने निवडून दिलेले खासदार आहेत. कोकणचा हक्काचा माणूस.