लेबनॉन देश अंधारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंधन टंचाईअभावी ब्रिटन, चीन, हिंदुस्थानवर ब्लॅकआऊटचे संकट घोंघावत आहे. केवळ या तीन देशांतच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा पहिला फटका लेबनॉनला बसला आहे. संपूर्ण लेबनॉन देश विजेअभावी अंधारात बुडाला आहे. इंधनाअभावी लेबनॉनच्या अल जहरानी आणि दीर अम्मार या वीज प्रकल्पांमधील वीजनिर्मिती 200 मेगावॅटपेक्षा खाली घसरली आहे. वीजटंचाईमुळे अनेक भागांतील वीज काही दिवसांसाठी कापण्याची घोषणा लेबनॉन सरकारने केली आहे. विजेअभावी काही कंपन्या बंद कराव्या लागल्या आहेत. वीज नसल्याने लोकांना अन्नधान्याचीही टंचाई भासू लागली असून महागाईने उच्चांक गाठला आहे.