
टच (टर्निंग अपॉर्च्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट ऍण्ड चाईल्ड हेल्प) संस्थेच्या वतीने वंचित आणि सुस्थितीतील मुलांना एकाच छत्राखाली आणण्यासाठी ‘क्रिएटिव टच’ या चित्रकला स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 12व्या ‘क्रिएटिव टच’ स्पर्धेसाठी मुलांनी आपल्या घरीच चित्रे काढून संस्थेकडे पाठवायची आहेत. सदर स्पर्धा ही चौथी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तीन गटांत असून प्रथम पारितोषिक दहा हजार, द्वितीय पारितोषिक पाच हजार, तृतीय पारितोषिक अडीज हजार व उत्तेजनार्थ रुपये एक हजार रोख स्वरुपात असेल. विद्यार्थ्यांनी आपली चित्रे 7 नोव्हेंबरपर्यंत आनंदराव पवार स्कूल (तळमजला), राम मंदिर रोड, वझिरा नाका, बोरिवली (प.) या पत्त्यावर पाठवावीत. स्पर्धेचे विषय हे www.touchmission.com या संकेस्थळावर उपलब्ध आहेत. संपर्क – 9819453873.





























































