
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉटस्अॅपची सेवा नुकतीच डाऊन झाली होती. त्यानंतर आता जीमेलची सेवा डाऊन झाली आहे. त्यामुळे नेटकरी त्रस्त झाले आहेत. देशात अनेकांना जीमेल लॉगिन करण्यात अडचणी येत आहेत. तर अनेकजण मेल पाठवू शकत नाहीत. तसेच त्यांना मेलही येत नसल्याने नेटकरी त्रस्त आहेत.
इंटरनेट सेवांच्या आऊटेजवर देखरेख ठेवणाऱ्या Down Detector या साईटनुसार 68 टक्के लोकांनी आपल्याला जीमेलचा अक्सेस मिळण्यात अडचणी येत असल्याचे म्हटले आहे. तर 18 टक्के युजर्सनी सर्वर कनेक्शनला रिपोर्ट केला आहे. तसेच 14 टक्के युजर्सनी लॉगिन होत नसल्याचे म्हटले आहे.
जीमेल डाऊन झाल्याने अनेक युजर्सनी ट्विटरवर मसेज टाकले आहेत. अनेकजण #gmaildown सोबत ट्विट करत आहेत. जीमेल अजूनपर्यंत या आउटेजचे कारण स्पष्ट केलेले नाही. हिंदुस्थानात काही भागातील अनेक युजर्सनी जीमेल डाऊन असल्याची तक्रार केली आहे.
नुकतेच फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉटस्अॅपची सेवा डाऊन झाली होती. सुमारे सहा तास या सेवा डाऊन होत्या.गेल्या आठवड्यात दोनवेळा या सेवा डाऊन झाल्या होत्या. यामुळे फेसबुकला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. या सेवा डाऊन झाल्याने सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राऊटर कॉन्फिग्रेशनमधील बिघाडामुळे या सेवा डाऊन झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. आता जीमेल सेवा नेमक्या कशामुळे डाऊन झाल्या आहेत, असा सवाल युजर्सला पडला आहे.




























































