
सतत मित्राच्या संपका&त राहून त्याच्याशी जवळीक साधते म्हणून बडबणाऱ्या कॉन्स्टेबलवर त्याच्या पोलीस पत्नीने वार केल्याची घटना माटुंग्यात तर तरुणाने प्रेयसीवर वार केल्याची घटना शीवमध्ये घडली.
सचिन डोईपह्डे (37) असे जखमी कॉन्स्टेबलचे नाव आहे. सचिनची पत्नीदेखील पोलीस असून ते वडाळा येथील काच कारखाना परिसरात राहतात. सचिनच्या पत्नीची तिच्या पोलीस मित्रासोबत जवळीक वाढली होती. काही दिवसांपूर्वी सचिनने दोघांना घरात एकत्र पकडले होते. पण पुन्हा असे करणार नाही असे पत्नी बोलल्यामुळे सचिनने प्रकरण वाढवले नाही. पण त्यानंतरही पत्नी व तिच्या मित्रामध्ये गाठीभेटी, पह्नवर बोलणे सुरूच होते. यावरून शुक्रवारी दोघा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. तेव्हा पत्नीने सचिनच्या खांद्यावर चाकूने वार केले. तिसरा वार वाचविण्यासाठी सचिनने सुरा पकडला. पण तिने सुरा ओढल्याने सचिनच्या हाताला गंभीर दुखापत झाली. सचिनला उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी पोलीस पत्नी फरार आहे.
दरम्यान, माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या नितेश बागडी (23) या तरुणाने पह्न उचलत नाही, भेटायला येत नाही, टाळते म्हणून प्रेयसीला शिवीगाळ करत तिच्या मानेवर चाकूने वार केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने शीव पोलीस तेथे आल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी नितेशला अटक केली आहे.





























































