सोनी बीबीसी अर्थवर सरेंगेटी-2

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनी बीबीसी अर्थ ‘सेरेंगेटी-2’च्या माध्यमातून वन्य जीवांची आणखी एक रोमांचकारी कथा मालिकेच्या रूपात सादर करणार आहे. सहा एपिसोडची ही मालिका सोमवारपासून सुरू झाली असून रात्री 9 वाजता सोनी बीबीसीवर प्रसारित होईल. आफ्रिकेच्या जंगलात वावरणाऱ्या प्राण्यांच्या नाटय़मय आणि भावनिकदृष्टय़ा एकमेकांशी जोडलेल्या कथा यात पाहायला मिळतील. प्राण्यांचे एकमेकांशी हास्यविनोद आणि ताणतणाव यात पाहायला मिळतील. तसेच मानवी जीवनाशी त्यांचे काय आणि कसे साम्य आहे हेदेखील यातून स्पष्ट होईल. सीरिजच्या दुसऱ्या भागात बकरीचे भावविश्व उलगडले जाणार आहे. त्यानंतर काळी सिंहीण, बिबटय़ांच्या प्रेमळ पिल्लांसोबतचा कळप त्यापुढील भागात पाहायला मिळतील. प्राण्यांच्या नात्यांमधील बंध दाखवतानाच या मालिकेत अद्वितीय गतिशीलता, वर्तन, क्षमता व कमकुवतपणा यांचाही उलगडा करण्यात येणार आहे.