मुंबईत मंगळवारी 15 टक्के पाणीकपात, भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील झडपा बदलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दोन झडपा बदलण्याचे काम तसेच पिसे-पांजरापूर संकुलातील नादुरुस्त उदंचन संच बदलण्याचे काम मंगळवार, 26 ऑक्टोबरला केले जाणार आहे. हे काम सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत होणार असल्यामुळे मुंबईत 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

दरम्यान, पवई येथे 1800 मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व आणि पश्चिम जलवाहिनीची गळती रोखण्याचे काम 26 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजेपासून बुधवार, 27 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 पर्यंत केले जाणार आहे. त्यामुळे एस (भांडुप, विक्रोळी), के-पूर्व (अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले पूर्व भाग), एच-पूर्व (वांद्रे, खार पूर्व भाग) आणि जी-उत्तर (दादर, माहीम, धारावी) येथील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

इथे पाणीपुरवठा बंद राहणार

ह एस विभाग : फिल्टरपाडा एस एक्स – 06 – (24 तास) – जयभीमनगर, बेस्टनगर, आरे मार्ग आणि परिसर, फिल्टरपाडा.

ह के/पूर्व विभाग : मरोळ बस बार क्षेत्र, केई 01 – (दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 वाजता) – चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक 1 व हनुमाननगर, मोटानगर, शिवाजीनगर, शहीद भगत सिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरानगर, मापखाननगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर.

ह के/पूर्व विभाग : सहार रोड क्षेत्र, केई 01 – (दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 वाजता) – कबीरनगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी अ‍ॅण्ड टी वसाहत

ह के/पूर्व विभाग : ओम नगर क्षेत्र, केई 02 – (पहाटे 4 ते सकाळी 8 वाजता) – ओमनगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतार पाखडी (पाइपलाइन क्षेत्र)

ह के/पूर्व विभाग : एमआयडीसी व भवानीनगर केई 10 – (सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता) – मुलगाव डोंगरी, सुभाषनगर, एमआयडीसी मार्ग क्रमांक 1 ते 23, भंगारवाडी, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्यायनगर, ठाकूर चाळ, साळवेनगर, भवानीनगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज.

ह के/पूर्व विभाग :  सीप्झ (24 तास) तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ (24 तास)

ह के/पूर्व विभाग : विजयनगर, मरोळ क्षेत्र, केई – 10ए – (सायंकाळी 6 ते रात्री 10.00 वाजता) – विजयनगर मरोळ, मिलिटरी मार्ग, वसंत ओआसिस, गांवदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा

ह एच/पूर्व विभाग : वांद्रे टर्मिनल पुरवठा क्षेत्र

ह जी/उत्तर विभाग : धारावी सायंकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत) – धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोरा कुंभार मार्ग.

ह जी/उत्तर विभाग : धारावी सकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (पहाटे 4 ते दुपारी 12 वाजेपर्यंत) – प्रेमनगर, नाईकनगर, जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फीट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग.