
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांच्या आई आणि त्यांच्या बहिणीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
राज ठाकरे आणि त्यांच्या आईच्या शरिरामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. सुरुवातीला राज ठाकरे यांच्या आईला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर घरातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात राज ठोकरे आणि त्यांची बहीण यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Mumbai | Maharashtra NavNirman Sena chief Raj Thackeray, his mother and sister test positive for COVID19. Thackeray and his sister admitted to Lilavati Hospital: Dr. Jalil Parkar, Lilavati Hospital pic.twitter.com/2LHHemVMZB
— ANI (@ANI) October 23, 2021

























































