सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा शुल्क 10 टक्क्यांनी वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करून विद्यापीठाने मागील तीन वर्षांत एकदाही परीक्षा शुल्क वाढविले नाही. यंदा दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय होईल, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक शिवकुमार गणापूर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कातूनच विद्यापीठाचा खर्च भागविला जातो. आता खर्च काढला असून, परीक्षा व प्रवेश शुल्काची रक्कम अपुरी पडू लागल्याचा सुर आहे. मागील तीन वर्षांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षा शुल्कात वाढ केली नाही. त्यामुळे यंदा 10 टक्के परीक्षा शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत सद्यस्थितीत 98 महाविद्यालये आहेत. 111 महाविद्यालयांपैकी अभियांत्रिकीची काही महाविद्यालये ‘बाटू’शी जोडली गेली आहेत. त्यामुळे सोलापूर विद्यापीठाअंतर्गत आता दरवर्षी 68 ते 69 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या परीक्षा शुल्कातून विद्यापीठाला साडेचार ते पावणेपाच कोटी रुपये मिळतात. त्यातील बहुतेक खर्च प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांवरच खर्च केला जातो.

दरम्यान, परीक्षेनंतर ज्यांना प्राप्त गुणाबद्दल साशंकता आहे, त्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे मागील काही सत्र परीक्षेत हा प्रकार बंद झाल्यानेही किद्यापीठाला रक्कम मिळालेली नाही. अनेक खर्चात विद्यापीठाने काटकसर केल्याचेही बोलले जात आहे. ऑक्टोबर 2020 मधील परीक्षेपूर्कीच परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय विचाराधीन होता. त्यानंतर जानेवारी, मार्च, जुलै 2021 मध्ये परीक्षा पार पडल्या. परंतु, कोरोनामुळे विद्यापीठाने विद्यार्थीहित पाहात तो प्रस्ताव तूर्तास मागे घेतला. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे.

आगामी सत्र परीक्षा ऑफलाइन होणार

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल केले असून, दैनंदिन कामकाज पूर्ववत होत आहे. कोरोना काळात ऑनलाइन परीक्षा पार पडल्या; परंतु त्यात विद्यार्थ्यांच्या गुणकत्तेचा कस न लागताच परीक्षा पार पडल्या. या परीक्षांमध्ये अनेक चुकीचे प्रकार पाहायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी तडजोड नको, जागतिक स्पर्धेत सोलापूर किद्यापीठाचे नाणे खणखणीत वाजायला हवे, या हेतूने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणारी आगामी सत्र परीक्षा ऑफलाइनच होणार आहे.