आज घाटकोपर येथे रोजगार मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपत्कालीन सेवा केंद्राने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून 31 ऑक्टोबर रोजी 10 ते 3 या वेळेत बर्वेनगर म्युनिसिपल शाळा नं. 3, घाटकोपर येथे पार पडणार आहे. तरुणांना सहभाग घेण्याचे आवाहन आपत्कालीन सेवा केंद्राचे अध्यक्ष रामदास साळवी यांच्यासह शरद हडवले, मंगेश मयेकर, संदीप कदम, नवनाथ आदक, मयूर गुरव, उमेश करंजकर, प्रदीप वामन, सुभाष खामकर यांनी केले आहे.