एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱया तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवासादरम्यान महिलेचा विनयभंग करणाऱया तिघांना अखेर बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. बहादूर वाघेला, आनंद भाई भरत भाई वाघेला आणि नटवजी बाबूभाई राजपूत अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार या गृहिणी आहेत. 21 दिवसांपूर्वी त्या पतीसोबत मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱया अवंतिका एक्स्प्रेसने सुरतला जात होत्या. एक्स्प्रेस बोरिवली स्थानकात आल्यावर बहादूर, आनंद भाई, नटवजी हे तिघे एका डब्यात आले. त्या डब्यातून तक्रारदार या प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्या तिघांनी तक्रारदार यांना पाहून टोमणेबाजी केली. त्याकडे महिलेने दुर्लक्ष केले. इंदूर स्थानक आल्यावर त्या खाली उतरल्या. इंदूर पोलीस ठाण्यात इंदूर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करून तो गुन्हा पुढील तपासासाठी बोरिवली रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला.
प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक दर्शन पाटील, उपनिरीक्षक मुलगीर आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा रचून त्या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली.