तमिळनाडूत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, 14 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात आतपर्यंत पावसामुळे 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील 538 झोपडपट्ट्या या पाण्यात उध्वस्त झाल्या आहेत, तर 4 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. या पावसामुळे 60 हून अधिक घरांचे नुकसान झाले असून राजधानी चेन्नईत अनेक घरात पाणी भरले आहे. यानंतरही हवामान विभागाने अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच इशारा दिला आहे.


चेन्नईतल्या अनेक भगात पाणी साचले असून रस्ते जलमय झाले आहेत. सखल भागात दोन फुटांवर पाणी साचले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला फटका बसला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक भागात वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाच इशारा दिल्याने एनडीआरफच्या जवानांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पूरग्रस्त जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 9 ते 12 नोव्हेंबर दरम्यान मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.