ऑस्ट्रेलिया नवा विश्वविजेता; न्यूझीलंडला पुन्हा एकदा उपविजेते पद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा जगज्जेते पदाचा करंडक उंचावण्याचा पराक्रम करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 विश्वचषकाच्या जेतेपदापासून वंचित होता. मात्र रविवारी झालेल्या किताबी लढतीत न्यूझीलंडचा 8 गडी व 7 चेंडू राखून धुव्वा उडवून ऑस्ट्रेलिया टी-20चा नवा जगज्जेता बनला. 2007पासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या जेते पदावर नाव कोरल्याने ऑस्ट्रेलियाचा 14 वर्षांचा वनवास अखेर संपुष्टात आला. जोश हेजलवूडची भन्नाट गोलंदाजी आणि डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी दणकेबाज अर्धशतके ही कांगारूंच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. एकदिवसीय विश्वचषकात उपविजेते पदावर समाधान मानावे लागलेल्या न्यूझीलंडला टी-20च्या विश्वचषकातही उपविजेते पदावरच समाधान मानावे लागले, हे विशेष.

वॉर्नर, मार्श, मॅक्सवेलचा तडाखा

न्यूझीलंडकडून मिळालेले 173 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 18.5 षटकांत केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात सहजपणे ओलांडून जेते पदाला गवसणी घातली. कर्णधार अॅरोन फिंचला (5) ट्रेंट बोल्टने तिसऱयाच षटकात मिचेल मार्शकरवी झेलबाद केले. करून झटपट बाद झाल्यानंतरही पक्के व्यावसायिक असलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजीवर त्याचा कुठलाही दबाव पडला नाही. डेव्हिड वॉर्नर व फिंचच्या जागेवर आलेला मिचेल मार्श (50 चेंडुत नाबाद 77) या जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ट्रेंट बोल्टने 13व्या षटकांत वॉर्नरची दांडी गूल करून ही डोईजड झालेली जोडी पह्डण्यात यश मिळवले. वॉर्नरने 38 चेंडूंत 53 धावा फटकावताना 4 सणसणीत चौकार व 3 टोलेजंग षटकार ठोकले. वॉर्नरच्या जागेवर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनेही मार्शला तोलामोलाची साथ दिली. या दोघांनी तिसऱया गडय़ासाठी 66 धावांची अभेद्य भागीदारी करून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 कर्णधाराची झुंजार खेळी

सलामीची जोडी अपयशी ठरल्यानंतर आलेल्या केन विल्यम्सनने कर्णधार पदाला शाजेशी खेळी केली. ग्लेन फिलिप्सने त्याला स्ट्राईक देताना 17 चेंडूंत 18 धावा करताना एक चौकार व एक षटकार लगावला. या दोघांनी तिसऱया गडय़ासाठी 68 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. जोश हेजलवूडने 18व्या षटकात या दोघांना बाद करून ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. फिलिप्स मॅक्सवेलकरवी झेलबाद झाला, तर विल्यम्सनने स्मिथकडे झेल दिला. मात्र बाद होण्यापूर्वी त्याने 48 चेंडूंत 85 धावा चोपून काढताना 3 उतुंग षटकारांसह 10 चेंडू सीमापार पाठवले. त्यामुळे नाणेफेकीचा काwल गमावून प्रथम फलंदाजी करणाऱया न्यूझीलंडला 20 षटकांत 4 बाद 172 धावसंख्या उभारता आली.