
राजस्थानमधील पुष्कर येथील पशु मेळ्यात एकापेक्षा एक उंट आणि घोडे आले आहेत. मात्र यामध्ये एक रेडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. महाकाय रेडय़ाचे नाव ‘भीमा’ असे असून त्याची किंमत 24 कोटी रुपये आहे.
रेडय़ाचे मालक जोधपूरचे रहिवासी जवाहरलला जांगीड यांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानातील एका व्यक्तीने या रेडय़ाला 24 कोटींची बोली लावली होती, पण त्यांनी ‘भीमा’ला विकण्यास नकार दिला. मुर्राह जातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठीच ‘भीमा’ला ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या देखभालीसाठी महिन्याला दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. त्याला दररोज तूप, लोणी, काजू-बदाम खायला दिले जाते.




























































