
मध्य प्रदेश सरकारच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय कालिदास सन्मान 2020’ प्रा. वामन केंद्रे यांना जाहीर झाला आहे. वामन केंद्रे यांना रंगभूमीवरील अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रा. वामन केंद्रे यांनी हिंदुस्थानी रंगभूमीचा ध्वज विश्वाच्या रंगमंचावर फडकविण्यात फार मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भरवलेले 8 वे थिएटर ऑलिंपिक्स हे त्याचे एक उदाहरण होय. आपल्या अन्यन्यसाधारण दिग्दर्शन शैलीमुळे आणि पथदर्शी नाटय़ निर्मितीमुळे त्यांची रंगभूमीवर वेगळी ओळख आहे. झुलवा, एक झुंज वाऱयाशी, दुसरा सामना, नातीगोती, तीन पैशाचा तमाशा, राहिले दूर घर माझे, गधे की बारात, सैयां भए केतवाल, टेम्ट मी नॉट, लडी नजरिया, चार दिवस प्रेमाचे, रणांगण, ती फुलराणी, प्रेमपत्र आदी त्यांची नाटकं गाजलेली आहेत.
मध्य प्रदेश सरकारच्या वतीने देण्यात येणारा लता मंगेशकर सन्मान ज्येष्ठ गायक शैलेंद्र सिंह (2019) तर संगीतकार आनंद- मिलिंद (2020) यांना जाहीर झाला आहे. प्रसिद्ध बासरी वादक सुचिस्मिता- देबोप्रिया यांना कुमार गंधर्व सन्मान जाहीर झाला आहे.
























































