माझ्या पराभवाला  शिवेंद्रराजेच जबाबदार; आमदार शशिकांत शिंदे यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी सरळ मनाचा राजकारणी असून, पक्ष चौकट मानणारा आहे. मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गाफील राहिलो हे मान्य आहे. पण, एकीकडे चर्चेत गुंतवून ठेवत दुसरीकडे उमेदवार पळवापळवीचे षडयंत्र रचण्यात आले, असे सांगत माझ्या पराभवाला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळे माझा पराभव झाला, असा थेट आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

सातारा जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी आज सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जे राजकारण झाले ते यापुढील निवडणुकीत होऊ नये, याची काळजी घेतली जावी. जे लोक विरोधात काम करतात ते सहकार पॅनेलमध्ये कसे आणि तेच बिनविरोध झाले; पण आम्ही प्रामाणिक काम करूनही ताकद असूनही पराभूत होतो. यामागे पक्षातील नेत्यांचे षडयंत्र आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.