B.1.1.529 व्हेरिएंट ‘डेल्टा’पेक्षा जास्त धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली. त्यातच नवीन व्हेरिएंट आढळल्याचे तज्ञांच्या लक्षात आले. वायरोलॉजिस्ट टय़ुलिओ जी ओटिवेरा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. हा व्हेरिएंट 1.1.529 या नावाने ओळखला जातो. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचे दक्षिण आफ्रिकेत 6, हाँगकाँगमध्ये 1, बोटस्वानामध्ये 3 आणि इस्रायल, बेल्जियममध्येही रुग्ण आढळून आले.

जागतिक आरोग्य संघटना म्हणते, सध्या फारशी माहिती नाही
दक्षिण आफ्रिकेत नवीन व्हेरिएंट आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना अलर्ट झाली. गुरुवारी तातडीने बैठक घेण्यात आली. या व्हेरिएंटमध्ये मोठय़ा प्रमाणात संख्येने म्युटेशन होत आहे (अंतर्गत संरचना बदलत राहण्याची क्षमता तसेच सतत रूप बदलणे). जेव्हा मोठय़ा प्रमाणावर म्युटेशन होते तेव्हा विषाणू नक्की कसा परिणाम करणार हे सांगता येणे कठीण असते असे जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ञ मारिया वेन केरकोव यांनी सांगितले. नवीन व्हेरिएंटचा अभ्यास सुरू आहे. सध्या आम्हाला याबद्दल फारशी माहिती नाही, असे केरकोव म्हणाल्या.

शेअर बाजारही घाबरला

आफ्रिकन कोरोनाचा शेअर बाजारानेही मोठा धसका घेतल्याचे शुक्रवारी दिसले. दिवसभरात बीएसई तब्बल 1687.94 अंकांनी घसरून 57,107.15 अंकांवर बंद झाला. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 7.35 लाख कोटी रुपये बुडाले.

रुपयाही घसरला

कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टचा फटका रुपयालाही बसला. डॉलरच्या तुलनेत रुपया आज तब्बल 37 पैशांनी घसरला.

50 प्रकारचे म्युटेशनची क्षमता

z हा व्हेरिएंट जगाची चिंता अधिकच वाढवणारा आहे. कारण त्यात तब्बल 50 प्रकारचे म्युटेशन आढळून आले आहे. तसेच या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरण्याचा, लागण झाल्यास रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळण्याचा धोका आहे.

नव्या व्हेरिएंटवर लससुद्धा कुचकामी!

z हा विषाणू अत्यंत वेगाने पसरत आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर कोरोनाची लसदेखील कुचकामी ठरत आहे.

हिंदुस्थानात अलर्ट

z नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.