24 तासात हजर व्हा अन्यथा सेवा समाप्ती, रत्नागिरीतील रोजंदारीवरील एसटी कामगारांना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी नोटीस देऊनही अद्याप कामावर हजर झालेले नाहीत त्या कर्मचाऱ्यांना 24 तासाची नोटीस बजावण्यात आली असून त्यांनी 24 तासात कामावर रजू व्हावे अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्याचा इशारा एसटीच्या रत्नागिरी विभागाने दिला आहे.

संपात सहभागी झालेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याची नोटीस 16 नोव्हेंबर रोजी बजावण्यात आली होती.नोटीस बजावूनही रोजंदारीवरील कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत.त्यामुळे एसटीने कारवाईचा इशारा दिला आहे.