
बहीण भावच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहेत. बीड तालुक्यात सख्ख्या भावासह चुलत भाऊ आणि अन्य एकाने बहीणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या अत्याचारामुळे अल्पवयीन बहिण गर्भवती राहिल्याची घटना घडली आहे. ती गर्भवती झाल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळात नात्याला काळीमा फासणाऱ्या गंभीर आणि विचित्र घटना घडत आहेत. अंबाजोगाईच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच बीड तालुक्यातील एका गावामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या भावाने, चुलत भावाने आणि अन्य एकाने शारिरीक संबंध ठेवले. त्या अत्याचारातून पिडीत अल्पवयीन गर्भवती राहिल्याने हा दुर्देवी प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात दोन भावासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका जणाला अटकही करण्यात आली आहे. अन्य दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
































































