
यंत्रमानव म्हणजे रोबोट. त्याला जशी आज्ञा दिली जाते तसे रोबोट वागतो. मात्र आता अमेरिकेच्या शास्त्र्ाज्ञांनी जगातील पहिल्या सजीव रोबोटची निर्मिती केली आहे. या रोबोटला ‘झेनोबोट्स’ असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा रोबोट प्रजनन करू शकतो, असा दावा शास्त्र्ाज्ञांनी केला आहे. मात्र प्रजनन प्रक्रिया प्राणी आणि वनस्पतींपेक्षा वेगळी आहे.
सजीव रोबोट बेडकाच्या स्टेम सेलपासून हा रोबोट तयार करण्यात आला होता. हा रोबोट पहिल्यांदा 2020 मध्ये तयार करण्यात आला होता. प्रयोगशाळेतील सजीवांची निर्मिती प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. वर्मोट युनिव्हर्सिटी, टफ्ट्स युनिव्हर्सिटी आणि हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या वायस इन्स्टिटय़ूट फॉर बायोलॉजिकली इन्स्पायर्ड इंजिनीअरिंगमधील शास्त्र्ाज्ञांनी तयार केलाय.
नवीन शोध वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त ठरू शकेल, असे शास्त्र्ाज्ञांचे म्हणणे आहे. पर्यावरण तसेच कर्करोगावरील उपचार, जन्मदोष व वयोमानपरत्वे येणाऱया आजारांवर रोबोटचा वापर करता येईल. रोबोट एकल पेशीने त्याच्यासारखे दिसणारे बाळ तयार करू शकतात.
शास्त्र्ाज्ञ जोशुआ बोन्गार्ड यांनी सांगितले की, झेनोबॉट्स चालू शकतात, जेनोबॉट्स पोहू शकतात हे आम्ही आधीच पाहिले आहे, आता ते त्यांची संख्यादेखील वाढवू शकतात.



























































