
मुंबई-ठाण्यासह नवी मुंबईला अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून आता स्टरलाइट पॉवरने पंबर कसली आहे. त्यानुसार ‘मुंबई ऊर्जा मार्ग’अंतर्गत पडघा येथील पेंद्रीय पॉवरग्रीडच्या वीज उपपेंद्रापासून खारघर येथील महापारेषणच्या वीज उपपेंद्रापर्यंत तब्बल 70 किलोमीटर लांबीची 400 केव्हीची डबल सर्किट उच्चदाब वीज वाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या वीज वाहिनीचे काम 2023 अखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातून तब्बल एक हजार मेगावॅटहून अधिक वीज मुंबईत वाहून आणणे शक्य होणार आहे.
मुंबईची सध्याची विजेची कमाल मागणी 3500 मेगावॅट असून त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. पडघा येथील पेंद्रीय पॉवरग्रीडच्या 765 केव्हीच्या वीज उपपेंद्रातून 400 केव्हीची वीज वाहिनी खारघर येथील महापारेषणच्या 400 केव्हीच्या वीज उपपेंद्रापर्यंत आणली जाणार आहे. त्यामुळे देशभरातील वीज खारघर वीज उपपेंद्रापर्यंत सहजपणे येणार असून तेथून पुढे खारघर-विक्रोळी या उच्चदाब वीज वाहिनीच्या माध्यमातून मुंबईपर्यंत सहजपणे अणता येणार आहे. त्यासाठी पेंद्रीय वीज प्राधिकरणाने पडघा-खारघर, पडघा-नवी मुंबई आणि आपटा-कळवा या उच्चदाब वीज वाहिन्या उभारण्याचे काम स्टरलाइट पॉवरला दिले असल्याचे पंपनीचे प्रकल्प संचालक निनाद पितळे यांनी स्पष्ट केले आहे.
असा असेल मुंबई ऊर्जा मार्ग
मुंबईसह परिसराला अतिरिक्त वीज पुरवठा करण्यासाठी स्टरलाइट पॉवर ‘मुंबई ऊर्जा मार्ग’अंतर्गत तीन डबल सर्किट वीज वाहिन्या उभारणार आहे. त्यानुसार पडघा-खारघर ही 70 किलोमीटरची डबल सर्किट उच्चदाब वीज वाहिनी असणार आहे. तसेच याच वीज वाहिनीला इंटरकनेक्ट करून 19 किलोमीटरची 400 केव्हीची वीज वाहिनी नवी मुंबईसाठी आणली जाणार आहे. तर आपटा-कळवा ही एक किलोमीटर लांबीची 220 केव्हीची वीज वाहिनी असणार आहे. त्यामुळे खारघर वीज उपपेंद्रावर येणारा अतिरिक्त ताण कमी होणार असल्याचे स्टरलाइट पॉवरने म्हटले आहे.



























































