
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांकरीता जिल्हा वार्षिक आराखडयातून ग्रामीण रस्ते दुरुस्ती, इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालय इमारत, जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी सुधारणा, वळण बंधारे व शेतीच्या पाण्यासाठी आडवे पाट बांधणे, अंगणवाडी इमारती, शाळा खोल्या इमारती बांधणे अशा विविध कामांसाठी सुमारे 10 कोटी 26 लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती शंभूराज देसाई यांचे कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकात दिली आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे शिफारसशीनुसार आर्थिक वर्षातील सातारा जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा समावेश करण्यात आला होता. या आराखडयामध्ये समावेश असलेल्या विकास कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या कामांच्या निवीदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने ही कामे सुरु करणेसंदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी यांना शंभूराज देसाई यांनी सूचना केल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
























































