
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. आपला नवस पूर्ण झालेले भाविक तिरुपती बालाजीला सोने-चांदीचे दागिने अर्पण करतात. नुकतेच एका भाविकाने 5.3 किलोग्रॅम वजनाचे सोन्याचे हात बालाजीला अर्पण केले आहेत. मार्केट भावानुसार याची किंमत तब्बल तीन कोटी रुपयांच्या आसपास आहे. या भक्ताचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
मंदिराच्या अधिकाऱयांच्या माहितीनुसार गेल्या 50 वर्षांपासून ते भगवान वेंकटेश्वराची पूजा करतात. गेल्या वर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यावेळी त्यांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्यामुळे त्यांनी हे दान केले आहे.

























































