
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही तिचा बॉयफ्रेंड विकीसोबत येत्या 14 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिता व विकीच्या लग्नाच्या आधीच्या विधी देखील सुरू झाल्या असून नुकतीच तिचा मेंदीचा कार्यक्रम पार पडला. त्याच दरम्यान आता अंकिताने तिचा प्रीवेडिंग शूटचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
View this post on Instagram
तिच्या प्रीवेडिंगची थीम सफेद रंगाची ठेवली आहे. त्यात तीने सफेद रंगाची साडी तर विकीने सफेद रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. तसेच दुसऱ्या शूटमध्ये अंकिताने सफेद गाऊन घातला आहे तर विकीने सफेद पँटशर्ट घातले आहे. हा व्हिडीओ त्यांनी दुबईत शूट केल्याचे समजते.

























































