
देवगडमधील पुरळ पुजारेवाडी येथील सुहास धोंडू पुजारी (वय 50) हे मासेमारी करण्यासाठी केळयेवाडी कलंबई खाडीमध्ये गेले असता त्यांच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना ही रविवारी सकाळी 5 ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विजयदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पुरळ पुजारेवाडी येथील सुहास धोंडू पुजारी यांचा खाडीमध्ये मासेमारी करण्याचा व्यवसाय होता. रविवारी सकाळी 5 वाजता केळयेवाडी कलंबई खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी साहित्य घेऊन ते एकटेच गेले होते. मासेमारी करत असताना केळेवाडी खाडी किनार्यावर पाण्यामध्ये तोल जाऊन किंवा पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
पूजारी 11 वाजेपर्यंत घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी व शेजारच्यांनी शोधाशोध केली. त्यावेळी पाण्याला ओहटी असल्याने केळेवाडी खाडीमधून त्याचा मृतदेह पाण्यात वाहून समुद्राच्या दिशेने खालची केळयेवाडी कलंबई या ठिकाणी अल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. यानंतर त्यांनी पोलीस पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर विजयदुर्ग पोलिसांना घटनेची माहिती देत घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मूत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी अधिक तपास विजयदुर्ग पोलीस करीत आहेत.





























































