‘एमआयएम’चे दोन आमदार पाच वर्षे गप्प का होते, काँग्रेसच्या माजी आमदाराचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस आघाडी सरकारने 2014 साली मुस्लिम समाजाला महाराष्ट्रात 5 टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई हायकोर्टानेही मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मुस्लिम आरक्षणासाठी काँगेस पक्ष संघर्ष करत असताना एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते, परंतु पाच वर्षे हे आमदार मुस्लिम आरक्षणावर गप्प का बसले? फडणवीस सरकारला कधीही जाब का विचारला नाही, असा सवाल माजी आमदार व प्रदेश काँग्रेसकार्याध्यक्ष आरीफ मोहम्मद नसीम खान यांनी केला.

निवडणूक आल्यावरच एमआयएमला मुस्लिम आरक्षण आठवते. निवडणूक संपली की यांना आरक्षण आठवत नाही, असा टोलाही नसीम खान यांनी लगावला. भाजप व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आरक्षणावरून आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांनी व त्याच्या एमआयएम पक्षाने मुस्लिम समाजासाठी काय केले असा सवाल केला.