
गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला मालवणी पोलिसांनी अटक केली. कोहिनूर खुर्शीद आलम शेख उर्फ गेमवाली असे तिचे नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी 8 किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत 1 लाख 64 हजार रुपये इतकी आहे.
मालाड मालवणीच्या प्लॉट क्रमांक 4 येथे काही जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर सहायक निरीक्षक राकेश पवार यांच्या पथकाने तेथे सध्या वेशात सापळा रचला. सापळा रचून पोलिसांनी कोहिनूरला ताब्यात घेतले. तिच्याकडून 8 किलो गांजा जप्त केला. कोहिनूर ही मालवणी परिसरात राहत असून तिच्या राहत्या घरातूनदेखील काही गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. गांजा तस्करीप्रकरणी कोहिनूरला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

























































