देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत 13 जागांकरिता 41 उमेदवार रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकिमध्ये 13 प्रभागांकरीता 41 उमेदवार निवडणूक रिंगणात असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 4 उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने एकूण वैध 45 उमेदवारांपैकी 41 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज मागे घेणारे प्रभाग क्र 2 सुधीर तांबे, प्रभाग क्र 9 सुरेश कदम, मिलिंद माने, प्रभाग क्र 12 परिमल नलावडे यांचा समावेश आहे. उमेदवारांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी अशी आघाडी असतानाही प्रभाग क्र 13 मध्ये शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने असून भाजप व काँग्रेस उमेदवार रिंगणात आहेत.या ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. 13 प्रभागातील 13 जागांकरिता 41 उमेदवार रिगणात आहेत. या शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस तर काही प्रभागांमध्ये चौरंगी ,तिरंगी तर काही प्रभागांमध्ये दुरंगी लढती होणार आहेत.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकिमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये स्वरा सुशील कावले व रिया रविंद्र शेटगे, प्रभाग क्रमांक 2 मध्ये धिरज गोविंद बाणे,तेजस दत्तात्रय मामघाडी,अब्दुल रशीर अल्लीखान, प्रभाग क्रमांक 3 मध्ये अश्विनी अरविंद कावले,कल्पना गुरुनाथ पाटकर,रुपाली दिनेश पाटकर, प्रभाग क्रमांक 6 मध्ये तन्वी योगेश चांदोस्कर,निधी निनाद देशपांडे,साची प्रमोद चांदोस्कर, प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रणाली मिलिंद माने,विशाल अर्जुन कोयंडे, प्रभाग क्रमांक 10 मध्ये मिताली राजेश सावंत,गौतमी रमेश कदम, प्रभाग क्रमांक 11 मध्ये मनोज दत्तात्रय पारकर,अनिल विनायक कोरगावकर,निवृत्ती रविंद्र तारी, प्रभाग क्रमांक 12 ,ज्ञानेश्वर सुर्यकांत खवळे,दयानंद श्यामराव पाटील,शैलेश रमेश महाडिक,नितिन शरद बांदेकर, प्रभाग क्रमांक 13 मध्ये उमेश भास्कर कणेरकर,उमेश धनंजय गोळवणकर,विशाल विकास मांजरेकर,सुरेश धाकु देवगडकर,किरण बाबाजी कांबळी, प्रभाग क्रमांक 14 मध्ये हर्षा उमेश ठाकूर,अरुणा योगेश पाटकर, प्रभाग क्रमांक 15 मध्ये श्रध्दा बापू आंबेरकर,आदया अमेया गुमास्ते यांनी याच प्रभागातून आपले दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.प्रभाग क्रमांक 16 मध्ये शरद रामचंद्र ठुकरुल,विक्रांत विलास गोळम,अंकुश सिताराम लाड,प्रकाश दत्तात्रय सावंत,महेश प्रभाकर नलावडे, प्रभाग क्रमांक 17 मध्ये साक्षी गजानन प्रभू,प्रांजली जयप्रकाश प्रभू,रुचा रविंद्र कोयंडे, यांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरली होती. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजेच 13 डिसेंबर रोजी खरे निवडणुकिचे चित्र स्पष्ट झाले आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपा स्वतंत्र, शिवसेना राष्ट्रवादी प्रभाग क्र 13 मैत्रीपूर्ण लढत अपवाद वगळता एकत्र व काँगेस स्वबळावर 7 जागा लढवीत आहेत.तर प्रभाग क्र .13 मध्ये भाजप,शिवसेना राष्ट्रवादी, व काँग्रेस पक्ष यांच्या अधिकृत उमेदवारांमध्ये चौरंगी लढत अटळ आहे. अशा काही प्रभागामध्ये तिरंगी लढती होणार आहे.