संभाजीनगरातील शाळा सोमवारी उघडणार, आठवड्याची सुट्टी दोन दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

संभाजीनगर शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी घेतला आहे. 20 डिसेंबरपासून शाळेची घंटा वाजेल. मार्च 2020 पासून घरात बसून असलेले विद्यार्थी 20 महिन्यानंतर शाळेत जाणार आहेत.

कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर व तिसरी लाट लांबणीवर पडल्याने राज्यशासनाने एक डिसेंबरपासून प्राथमिक विभागाचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली. वीस महिन्यानंतर शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या. पण शहरातील प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नव्हत्या.

ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर 10 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेचे प्रशासक पांडेय यांनी जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी आणखी पाच दिवस या परिस्थितीवर लक्ष ठेवून निरीक्षण केले जाईल. 15 डिसेंबरला पहिली ते सातवीपर्यंतची शाळा कधीपासून सुरू करायची याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. असे असले तरी सोमवारी रात्री त्यांनी 20 डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली असल्याचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले.

दुसरा डोस घेतला नसेल तर 500 रुपये दंड, मनपा प्रशासकाचे आदेश; बुधवारपासून कारवाई

पाच दिवसांचा असेल आठवडा

सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा राहणार आहे. सोमवार ते शुक्रवार शाळा भरेल व शनिवार, रविवारी सुटी असेल. शनिवारी शाळांची साफसफाई केली जाईल, असे थोरे यांनी सांगितले.

मुस्लिमांना तात्काळ आरक्षण दिल्यास MIM मनपा निवडणूक लढविणार नाही! जलील यांची नौटंकी