जातीपातीच्या राजकारणातच महाराष्ट्र खितपत पडावा असं अनेकांना वाटतंय, ओबीसी आरक्षणावरून राज ठाकरेंची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण जोपर्यंत जातीपातीमधून बाहेर येणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या गोष्टी, चांगला महाराष्ट्र मिळणार नाही. अनेकांना जातीपातीच्या राजकारणातच महाराष्ट्र खितपत पडाका असं वाटतंय आणि त्यासाठी हे सगळं चाललंय, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून केली.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधलं असता ते म्हणाले की, एकदम अचानक हा ओबीसीचा विषय आला कसा? मग ते केंद्र सरकारने यांना मोजणी करायला कशी काय सांगितली. मग कोर्टात याविरोधात कसा काय निर्णय आला? हे दिसतं तेवढं सरळ प्रकरण नसल्याचे सांगत जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडण्याची गरज असल्याचे सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

एसटी कर्मचाऱ्यांनी सर्व संघटना बाजूला ठेवून आंदोलन सुरू ठेवले आहे. चार-चार महिने पगार होत नाहीत. त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्यावर ‘मेस्मा’ची कारवाई करणे योग्य होणार नाही. एसटी कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, असेही ते म्हणाले.