
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मुंबई शहरातील विविध न्यायालयांमध्ये शनिवारी तब्बल 7445 प्रकरणे निकाली निघाली आहेत. तसेच 699 कोटी रुपयांची वसुली करत संबंधितांना भरपाई दिली आहे. यामध्ये अपघात, मालमत्तेबाबतचे वाद, बँकांच्या वसुलीचे दावे, गुन्हेगारी केसेसचा समावेश होता. लोक अदालतमध्ये 69 हजार 774 प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी 7 हजार 445 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये वाहन अपघातात बळी गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी 8 लाख रुपयांची भरपाई मिळवून दिली आहे, तर दुसऱ्या एका 450 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या प्रकरणात एस्प्लेनेड कोर्टाने दोन्ही बाजूमध्ये समेट घडवून आणत प्रकरण निकाली काढले. दरम्यान लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी महिला न्यायाधीश, वकील आणि महिला कर्मचाऱ्यांनी विशेष भूमिका पार पडली असल्याचे मुख्य न्यायमूर्ती आणि डीएलएसएच्या मुंबई अध्यक्ष उर्मिला जोशी-फाळके यांनी स्पष्ट केले आहे.





















































