चिपळूण कार्यालयातील सहाय्यक निबंधक लाचखोर शिपायाला रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीकरीता लोकसेवकाने कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 7 हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चिपळूण येथील शिपाई दीपक शांताराम पाष्टे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

तक्रारदाराने बांधकाम व्यावसायिकाच्या वतीने एका इमारतीच्या गृहनिर्माण संस्था नोंदणीकरीता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चिपळूण या कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. त्या इमारतीचे गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र संस्थेची मंजूर उपविधी, सहकारी संस्था नोंदणी अधिसूचना ताब्यात देण्याकरीता कार्यालयाचा शिपाई दीपक पाष्टे याने कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी 12 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 7 हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीने सापळा रचून दीपक पाष्टे याला लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण आणि पोलीस निरिक्षक नेत्रा जाधव, सहाय्यक फौजदार ओगले, पोलीस हवालदार कोळेकर, नलावडे, आंबेकर, पवार, गावकर, कांबळे यांनी केली.