
बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या एकांकिका विभागाची स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत ‘स्लाईस ऑफ लाईफ’ या एकांकिकेने बाजी मारली.
13 आणि 14 डिसेंबर 2021 रोजी दामोदर नाटय़गृह परळ येथे बेस्टचे दिवंगत कलावंत राजेश कदम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे स्पर्धा झाली नव्हती. त्यामुळे यावर्षी सर्व कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या आंतर आगार एकांकिका स्पर्धेत 11 गट सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षक नाटककार संभाजी सावंत आणि नाटय़लेखक विजय टाकळे होते. अभिनेते विजय पाटकर, बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ आणि राजेश हाटले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
- सर्वोत्कृष्ट एकांकिकाः स्लाईस ऑफ लाईफ (दादर), टय़ुलिप (प्रतीक्षानगर), सेक्स (ओशिवरा- वांद्रे)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः सचिन म्हात्रे (स्लाईस ऑफ लाईफ), आनंदा पुंभार (टय़ुलिप)
- सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनाः प्रशांत सावंत (स्लाईस ऑफ लाईफ), सुशील शिर्पे (टय़ुलिप),
- सर्वोत्कृष्ट नेपथ्यः भालचंद्र म्हात्रे (टय़ुलिप), चारुदत्त वैद्य (स्लाईस ऑफ लाईफ)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीः अनुप्रिता मांगले (असं घडलंच नसतं तर…), ममता शेडगे (नाती)
- सर्वोत्कृष्ट अभिनेताः सचिन म्हात्रे (स्लाईस ऑफ लाईफ), अभिनय भोसले (स्लाईस ऑफ लाईफ), गणेश मिंडे (टय़ुलिप)
- सर्वोत्कृष्ट लेखकः योगेश शिंदे (मी तू), घनश्याम परकाळे (नाती)
- सर्वोत्कृष्ट संगीतः सुचिता राणे (स्लाईस ऑफ लाईफ)


























































