11 वर्षांची असल्यापासून पॉर्न पाहायला सुरुवात केली! गायिकेच्या खुलाश्यामुळे खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॉर्नचं व्यसन ही अत्यंत गंभीर समस्या आहे. त्याचा मनावर खूप गंभीर परिणाम होतो. लहान वयातच पॉर्न पाहायचं व्यसन लागल्याने भीतीदायक स्वप्न पडायची असा खुलासा एका गायिकेने केला आहे.

या गायिकेचं नाव बिली आयलिश असं आहे. बिली अमेरिकेतील एक प्रसिद्ध गायिका आणि गीतकार आहे. 2016मध्ये ओशन आइज नावाचं तिचं गाणं खूप प्रसिद्ध झालं. तिने सात वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. कमी वयातच तिला प्रसिद्धी मिळाली असून तिच्या गाण्यांमुळे ती नेहमी चर्चेत असते.

आता मात्र ती तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. बिलीने नुकत्याच एका मुलाखतीत 11 वर्षांची असल्यापासून अश्लील व्हिडीओ पाहत असल्याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, मला वाटतं पॉर्न ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे. मी 11 वर्षांची असल्यापासून पॉर्न पाहू लागले. मला वाटतं की त्या फिल्म्सने माझ्या मनावर परिणाम केला, असं बिली म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by BILLIE EILISH (@billieeilish)

ती पुढे म्हणाली की, मला खूप वाईट आणि उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटायचं, इतकं मी पॉर्न पाहायचे. त्यातील हिंसक प्रकार पाहून तुमची नैसर्गिक सेक्सची भावना प्रभावित होते. विशेषतः तुम्ही जेव्हा हिंसक प्रकारचं पॉर्न पाहायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला ते करावंस वाटतं. सुरुवातीला मीही सेक्स करताना अशा चुकीच्या गोष्टींसाठी मनाई करू शकत नव्हते, कारण पॉर्नमुळे मला त्या गोष्टी योग्य वाटत होत्या. माझ्या आईला जेव्हा हे कळलं तेव्हा ती देखील घाबरली होती. मला या व्यसनामुळे विचित्र आणि भीतीदायक स्वप्न पडायची, असं बिली म्हणाली.