मीरा जोशीची मोहिनी! ‘सोन्याची पावलं’ मालिकेत झाली एंट्री 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

‘बायको अशी हव्वी’ मालिकेत कटकारस्थान रचणारी राखी असो किंवा ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’मधील बेधडक वकील… अभिनेत्री मीरा जोशी ही छोटय़ा पडद्यावर सातत्याने आव्हानात्मक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. आता कलर्स मराठीवरील ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत ती चक्क चेटकिणीच्या भूमिकेत झळकणार आहे. मोहिनी असे तिच्या पॅरेक्टरचे नाव असून नुकतीच या मालिकेत तिची एंट्री झाली आहे.

‘सोन्याची पावलं’ ही मालिका सध्या नवीन वळणावर आहे. इनामदार घराण्यातील वहिनी आणि नणंद यांच्या भांडणांमध्ये त्यातील एक वहिनी इनामदार घराण्याचा नाश करण्यासाठी एका चेटकिणीला बाटलीतून बाहेर काढते. या चेटकिणीच्या एंट्रीमुळे इनामदारांच्या घरात कोणते नवीन वादळ निर्माण होणार, हे मालिकेत पाहायला मिळेल. भूमिकेविषयी मीरा म्हणाली, ‘या मालिकेत मी चेटकिणीची भूमिका साकारतेय. आपल्या निळ्या डोळ्यांच्या माध्यमातून ती समोरच्याला मोहीत करते, हातातील जादुई शक्तीच्या सहाय्याने त्यांना इजा करते. असं काहीतरी सुपर नॅच्युरल  पॅरेक्टर मी पहिल्यांदाच करतेय.’

ग्रामीण भाषा, गडद मेकअप 

मीरा म्हणाली, ‘मालिकेत पहिल्यांदाच मी ग्रामीण बाज असलेली भाषा बोलताना दिसणार आहे. त्यासाठी काही वर्कशॉप केले. माझा लूक अत्यंत वेगळा आहे. अत्यंत गडद मेकअपमध्ये मी दिसणार आहे. काही सीन नॉर्मल डोळ्यांमध्ये, काही सीन ब्ल्यू लेन्स लावून शूट करावे लागतात अशी सगळी तारेवरची असते. गतवर्षी आलेल्या ‘इंदौरी इश्क’ या वेबसीरिजमध्ये मीरा साध्याभोळ्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. अगदी त्याच्या विरुद्ध भूमिका ती आगामी ‘ऑरेंज लिली’ या वेबसीरिजमध्ये साकारतेय. यात ती ‘सायको’ प्रेयसीच्या भूमिकेत आहे. याशिवाय चार भाषेत तयार झालेले एक गाणे मीरावर चित्रित झाले आहे.