बीडमध्ये भीषण अपघात, घरासमोर उभ्या सख्ख्या बहिणींना स्कॉर्पिओने उडवल्याने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे रविवारी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. घरासमोर दारात उभ्या असलेल्या दोन सख्या बहिणींना स्कार्पिओ चालकाने विरूध्द दिशेने येत धडक दिली आणि दोनशे फूट फरफटत नेले. या अपघातात दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला, तर दोन तरुण गंभीर जखमी झाले.

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोहिनी गाडेकर (वय -27) व रोहिणी गाडेकर (वय – 23) या दोन सख्ख्या बहिणी घरापुढे शतपावली करत होत्या. त्याच दरम्यान विरूध्द दिशेने आलेल्या स्कॉर्पिओने (एम.एच.12 एम.आर. 9113) दोघींना उडवले आणि दोनशे ते तीनशे फूट फरफटत नेत जबर जखमी केले. तसेच स्कॉर्पिओने दुचाकीलाही उडवले. यात अजित मोरे, संतोष आगे हे दोन तरूण जखमी झाले.

दरम्यान, गावकऱ्यांनी जखमी तरुण-तरुणींना पाटोदा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. परंतु तरुणींची तब्येत बिघडल्याने त्यांना बीड जिल्हा रूग्णालयाकडे दाखल करण्यास सांगितले. रुग्णालयात नेत असतानाच दोघींची प्राणज्योत मालवली.