युनियन बँक घोटाळा प्रकरण : ईडीची मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युनियन बँक घोटाळा प्रकरणात आज सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईतील 8 ठिकाणी छापेमारी केली. त्यासाठी दिल्लीतील ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. दिल्लीहून सक्त वसुली संचालनालयाच्या 30 ते 40 अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. या पथकांनी मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी केली आहे. मुंबईतील अधिकाऱ्यांबरोबर दिल्लीचे अधिकारी याबाबत तपास करत आहेत. दरम्यान, घोटाळ्याशी संबंधित अनेक लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.