10th 12th Board Exam Time Table- पोरांनो तयारीला लागा, दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार 10वी आणि 12वीच्या परीक्षा मार्चपासून सुरू होणार आहेत.

इयत्ता 12वीची परीक्षा 4 मार्च 2022 पासून आणि 10वीची परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून वेळापत्रक जाहीर झाल्याची माहिती दिली. mahahsc.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी परीक्षेची वेळापत्रक तपासू शकतात.