लग्नात नाचायचे किती पैसे घेतेस! अभिनेत्रीला विचारला प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलाकारांना अनेकदा त्यांच्या खासगी जीवनातील गोष्टींवरून ट्रोल केले जाते. नुकतंच एका अभिनेत्रीला तिच्या मैत्रीणीच्या लग्नात नाचण्यावरून नेटकऱ्यांनी धारेवर धरलं. तिला निर्लज्ज म्हणत ती लग्नात नाचायचे किती पैसे घेते असे सवाल तिला सोशल मीडियावरून करण्यात आले. या अभिनेत्रीने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Galaxy Lollywood (@galaxylollywood)

हा प्रकार घडला आहे पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा तोमर हिच्यासोबत. आयेशाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती एका लग्नात मुन्नी बदनाम हुई या गाण्यावर नाचताना दिसत आहे. मात्र तिचा हा डान्स पाकिस्तानी नेटकऱ्यांना आव़डला नसून त्यांनी तिला वाईटरित्या ट्रोल केले आहे. मात्र यावेळेस आयेशाने ट्रोलर्सपुढे शांत न राहता त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Omar (@ayesha.m.omar)

‘मी माझ्या मैत्रीणीच्या लग्नात माझ्या मित्र परिवारासोबत नाचत होते. ते एका जवळच्या मैत्रीणीचे लग्न होते. त्यासाठी मी कोणतेही पैसे आकारले नव्हते. आम्ही देखील तुमच्यासारखेच आयुष्य जगतो. जसे तुम्ही तुमच्या मित्र मैत्रीणीच्या, नातेवाईकांच्या लग्नात नाचता तसेच आम्हीही नाचतो. हे सर्व त्यांच्या आनंदात सहभागी होताना आपसूकच घडलेलं असतं. पैशासाठी नाही. आम्ही सर्वकाही पैशासाठी करत नाही’, असे उत्तर तिने नेटकऱ्यांना दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Omar (@ayesha.m.omar)

काही दिवसांपूर्वी आयेशा ओमरचे सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकसोबतचे स्विमिंग पूलमधील फोटोशूट व्हायरल झाले होते. त्या फोटोशूटनंतर अनेकांनी सानियाला जपून राहायला सांगितले होते. मात्र त्यावरही आयेशाने स्पष्टीकरण देत ट्रोलर्सचे तोंड बंद केले होते.