
शिवनेर व आयडियल स्पोर्टस् अॅकॅडमीतर्फे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत प्रशिक्षणासह 16 वर्षांखालील शालेय मुलामुलींचे विनाशुल्क बुद्धिबळ स्पर्धेचे अंतिम सामने 25 डिसेंबर ऐवजी 31 डिसेंबर रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकूलित सभागृहात होणार आहेत. कोरोना प्रादुर्भावात सध्या अचानक वाढ होत असल्याची चिंता पालक वर्गाने व्यक्त केल्यामुळे संयोजकांनी पूर्वनियोजित अंतिम स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम फेरीतील स्पर्धकांनी घरी सराव घेताना तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक अल्वारीस नेव्हिल यांच्या मार्गदर्शनाचा फोनवर लाभ घ्यावा.



























































