इमामाकडून जिहादचे समर्थन फ्रान्समध्ये मशिदीला टाळे ठोकले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मशिदीतून जिहादचे समर्थन करीत भडकावू भाषणे इमामांकडून केली जात असल्यामुळे फ्रान्स सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. एका मशिदीला टाळे ठोकण्यात आले असून, सहा महिन्यांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरिसपासून शंभर किलोमीटरवर बेवैस भागात ही मशीद आहे. या मशिदीचा इमाम ख्रिश्चन, ज्यू समाजाविरुद्ध भडकावू भाषण करून हिंसेचे आणि जिहादचे समर्थन करीत होता. जिहादसाठी लढणारे ‘हीरो’ आणि गैरमुस्लिम हे ‘शत्रू’ असल्याचे भाषण इमाम करीत होता. यामुळे मशीदच बंद करण्याची प्रक्रिया केली आहे. मशिदीला टाळे ठोकण्याची कारवाई करण्याचे सुपोला फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमिनन यांनी दोन आठवडय़ांपूर्वीच केले होते.

2600 प्रार्थनास्थळांवर सरकारचा वॉच

कट्टरवादी आणि फुटीरवादी कारवाया रोखण्यासाठी फ्रान्सने कठोर कायदा केला आहे. गेल्या काही महिन्यांत 100 मशिदी आणि मुस्लिम प्रार्थनास्थळांवर सरकारची नजर आहे. अशा 2600 ठिकाणांची चौकशी केली असून, सहा ठिकाणांवर बंदची कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.