व्यावसायिक गॅस स्वस्त, एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन ऑइलने नवीन वर्षात ग्राहकांना खास भेट दिली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय इंडियन ऑइलने  घेतला आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक सिलिंडरचे दर 100 रुपयांनी वाढवले होते. मात्र आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही दरवाढ मागे घेण्यात आल्याने हॉटेल मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.